चित्रपट बघा -
कथानक -
एका दुर्गम खेड्यातील एका तरुण मुलीचे लग्न शेजारच्या गावातील एका सैनिकासोबत होते. ते एकमेकांना ओळखण्याच्या आधीच तिचा पती सैन्यात परत बोलावला जातो आणि युद्धात त्याचा मृत्यू होतो. गावातील लोक तिला अपशकुनी मानतात आणि तिच्या सासरच्या तसेच माहेरच्या लोकांनी तिचा त्याग केला जातो.
पण सरकार तिच्या मृत पतीसाठी नुकसानभरपाई जाहीर करताच, तिच्या परिस्थितीला कलाटणी मिळते. गावातील प्रमुख तिच्या पतीच्या मृत्यूवर सहानुभूती दाखवत राजकीय प्रसिद्धी मिळवू पाहतात, पण कोणीही तिच्या विधवेच्या स्थितीचा विचार करत नाही.
गावात गोंधळ उडतो (धुडगूस) जेव्हा एका राजकारण्याकडून त्या सैनिकाच्या विधवेकरिता २५ लाख रुपयांचे बक्षीस आणि जमिनीचा तुकडा जाहीर केला जातो.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचा : IMDb
Credit: Work is released under CC-BY-SA