डॉक्युमेंट्री बघा -
कथानक -
या व्हिडिओमध्ये सांगितल्या गेलेल्या. श्री शंकर महाराजांच्या जन्म कथेवर अनेक बोट उचलले जातात. कुणाचं म्हणणं असतं की अंतापुर या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला कुणाचं म्हणणं आहे की हिरे या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. श्री शंकर महाराजांनी आपल्या नागेश घनेश्वर या भक्ताला स्वतः मी "उपासनी" या नावाच्या कुटुंबात मंगळवेढे, पंढरपूर येथे जन्मलो, असे सांगितले. काहीजण म्हणतात अंतापुरकर हे न्हावी समाजाचे होते आणि काहीजण म्हणतात अंतापुरकर हे ब्राह्मण समाजाचे होते. (या व्हिडिओमध्ये ब्राह्मण समाज सांगितले गेले आहे) श्री शंकर महाराज हे अवलिया आणि अत्यंत असाधारण व्यक्ती होते कदाचित त्यांना व्यक्तीही म्हणणं इकडे बरोबर नसेल. माञ एखादी डॉक्युमेंटरी फक्त ग्रंथ किंवा लिखाणावर नाही तर ग्रंथ, लिखाण तसेच मौखिक अनुभवांवर देखील बनली पाहिजे यावरून ही जन्म कथा या वेबसाईट मधून घेतली गेली आहे.
असं म्हणतात नदीच मूळ आणि संताचं कुळ कधी विचारू नये आणि हीच म्हण सत्य करण्यासाठी का होईना कदाचित शंकर महाराजांनी अशी लीला घडवून आणली असावी. आपण त्याच्या जाती, कुळधर्म, पंत, प्रांत, याच्यात न अडकतात. त्यांच्या कार्यावर त्यांच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करायला हवे. तरी पण आपल्याला जर या जन्म कथेबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल किंवा या जन्म कथेबद्दल माहिती घ्यायची असेल याचे मूळ जाणून घ्यायचे असेल तर या वेबसाईट मध्ये जाऊन आपण संशोधन करू शकता. आणि त्यांना या माहितीचे मूळ विचारू शकता.
Credit: Work is released under CC-BY-SA